ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांना दिलासा; आता जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑफलाईनही स्वीकारले जाणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात  होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. सर्व्हरवरती लोड आल्याने अनेक ठिकाणी अर्जच भरले जात नव्हते. त्यामुळे काम अत्यंत मंदगतीने सुरू होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने अखेर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत दोन दिवस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (caste verification form can submit offline says dhananjay munde)

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. म्हणूनच आज २९ डिसेंबर आणि उद्या ३० डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले असल्याचं धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे. अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्णक्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश देतानाच सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोचपावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता 29 व 30 डिसेंबर असे दोन दिवस अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दोन्ही दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती 1 जानेवारी 2021 पर्यंत बार्टीकडे लेखी स्वरूपात कळवावी, असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment