औरंगाबाद – औरंगाबाद काल झालेल्या महिला सरपंच परिषदेत बोलताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला होता. महिला सरपंचांना सल्ला देताना आमदार शिरसाट म्हणाले, ‘एक लक्षात ठेवा, सगळ्यात जर भामटा माणूस असेल तर तो ग्रामसेवक आहे. तो तुम्हाला कधी मूर्ख बनवल हे सांगता येत नाही तो तुमच्या एक तो असे दाखल पण बाहेर गेल्या सरपंच यांच्या सांगण्यावरून केले असे सांगत स्वतःच्या अंगावर पाणी येऊ देत नाही.’ त्यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद सुरू झाला आहे. याचे पडसाद आज राज्यभर उमटले असून महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनने आमदार शिरसाट यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसेच ग्रामसेवकांनी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे.
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी स्वतःच्या मतदारसंघात आलेल्या अनुभवावरून महिला सरपंचांना सल्ला देताना ग्रामसेवकांना भामटे संबोधले. महिला सरपंचांनी त्यांच्यापासून दूर राहावे असा सल्लाही आमदार शिरसाट यांनी यावेळी दिला. त्यांना पत्रकारांनी विचारले असता काही ग्रामसेवक चांगले काम करत असतील पण मला आलेल्या अनुभवावरून मी येते वक्तव्य केले. यावर मी ठाम आहे असे आमदार शिरसाट म्हणाले.
आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यातून थेट ग्रामसेवकांना टार्गेट केल्याने सरपंच परिषदेत त्यांचा हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला. याचे पडसाद राज्यभर उमटले असून ग्रामसेवकांनी आमदार शिरसाट यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे. आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात युनियनने आमदार शिरसाट यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्यांनी जाहीर माफी मागून आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. ग्रामसेवकांवर विश्वास ठेवू नका असे म्हटले ना आता ग्रामीण भागातील कामे कशी होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान खुलताबाद पंचायत समिती कार्यालयासमोर आमदार शिरसाट यांचा निषेध करून तालुका ग्रामसेवक संघटनेने धरल्याने धरणे आंदोलन तालुकाध्यक्ष आसाराम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले.