नात्याला काळिमा ! आजोबांकडून घृणास्पद कृत्य, मदतीसाठी काकाकडे गेली तर त्यानेही आणि मग भावानेही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई : वृत्तसंस्था – मुलांना आपल्या आजोबांकडे सुरक्षित वाटतं. मात्र अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामध्ये आजोबानी एका चिमुरडीसोबत घृणास्पद कृत्य केले आहे. ज्यामध्ये घरात आजोबा, काका आणि तिच्याच भावाने तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका 62 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर तिच्या सात वर्षांच्या नातीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर मुलीसह वेगवेगळ्या वेळेत मारहाण केल्या प्रकरणात त्यांचा मुलगा म्हणजेच मुलीचा काका आणि मुलीच्या 16 वर्षीय भावालाही अटक करण्यात आली आहे. ही घटना चेन्नईजवळी मडिप्पकममध्ये घडली आहे.

मुलगी कामात व्यस्त होती आणि त्यात मुलांचं ऑनलाइन क्लास असल्या कारणाने आजोबा आपल्या नातवांना घरी घेऊन आले. त्यांच्यासोबत त्यांचा एक मुलगाही राहत होता. पोलिसांनी सांगितले की 2 ऑगस्टच्या रात्री तिच्याच शेजारी झोपलेले तिचे आजोबा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. यानंतर घाबरलेली मुलगी तिच्या काकाच्या खोलीत गेली आणि तिला शांत करण्याच्या नावाखाली काकांनीदेखील तिच्याशी गैरवर्तन केले. यानंतर मुलगी पुन्हा तिच्या 16 वर्षांच्या भावाकडे मदतीसाठी गेली असता तिच्या भावानेदेखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

रविवारी 8 ऑगस्ट रोजी, जेव्हा मुलीची आई तिला भेटायला गेली, तेव्हा तिने पाहिले की मुलगी आजारी पडली आहे. यानंतर ती आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरांकडे घेऊन गेली. 7 वर्षांच्या मुलीने हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मेडिकल चेकअप केल्यानंतर मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं. यानंतर मुलीच्या आईने मडिप्पकम ऑलवुमन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी आजोबा आणि काका यांना तुरुंगात पाठवले आहे तर 16 वर्षीय मुलाला सुधारगृहात पाठविण्यात आलं आहे.

Leave a Comment