Friday, June 9, 2023

देशासाठी चांगला दिवस ! 7 महिन्यांतील सर्वात कमी कोरोना प्रकरणे, 10 राज्यांमध्ये 1 देखील मृत्यू नाही

नवी दिल्ली । मंगळवारी, देशात कोरोना महामारीची 14313 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. हा आकडा गेल्या 224 दिवसांतील सर्वात कमी आहे. साथीच्या दुसऱ्या लाट कमकुवत असूनही, केरळमधील परिस्थिती गेल्या महिन्यापर्यंत खूप भयावह राहिली. आता देशातील रिकव्हरी रेट 98.04 टक्क्यांवर गेला आहे. त्याच वेळी, एकूण 181 मृत्यू झाले आहेत आणि दहा राज्यांमध्ये एकही मृत्यूची घटना घडलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

गेल्या 18 दिवसांपासून दररोज येणाऱ्या नवीन संसर्गाची प्रकरणे 30 हजारांपेक्षा कमी आहेत. आता फक्त 214900 सक्रिय प्रकरणे अजून बाकी आहेत. मार्च 2020 नंतर ही संख्या सर्वात कमी आहे. मात्र, अशी भीती देखील व्यक करण्यात आली आहे की, ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन महिन्यांच्या सणासुदीमुळे कोरोना संसर्ग वाढू शकेल.

सणांमध्ये दक्षता आवश्यक
एक दिवस आधी, केंद्र सरकारने म्हटले होते-“ज्या राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्यांना कंटेनमेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर जमू न देण्यास सांगण्यात आले आहे. जर कोणत्याही जिल्ह्यात गर्दीला परवानगी असेल तर त्यासाठी पूर्ण परवानगी आवश्यक असेल आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांची संख्या देखील निश्चित केली जाईल.” मार्गदर्शक तत्त्वानुसार, फिजिकल आणि वैयक्तिक मीटिंग्जना प्रोत्साहन दिले जाणार नाही. दर्शन आणि व्हर्चुअल सेलिब्रेशनला प्रोत्साहन दिले जाईल. पुतळा दहन, पंडाल दौरा, दांडिया आणि गरबा यांचे आयोजन प्रतीकात्मक असावे.

आरोग्य मंत्रालयाचे आवाहन
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार- ‘आम्ही सध्याची परिस्थिती हलक्याने घेऊ शकत नाही. आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की, कोरोना संसर्गामुळे होणारा साथीचा रोग अद्याप संपलेला नाही. आपण सावध न राहील्यास, ते आणखी वाईट होऊ शकेल. लोकांनी गर्दीत जाणे टाळावे आणि अनावश्यक प्रवास करू नये. शक्य तितके घरीच रहा आणि सणांच्या दरम्यान ऑनलाइन खरेदी करा.

2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी लसीची परवानगी
दरम्यान, भारतीय केंद्रीय औषध प्राधिकरणाने भारत बायोटेकच्या ‘Covaxin’ लसीला दोन ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांना काही अटींसह परवानगी देण्याची शिफारस केली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने सप्टेंबरमध्ये दोन ते 18 वर्षे वयोगटातील मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसाठी आणि कोविड -19 विरोधी लस Covaxin च्या चाचणीचा 2/3 टप्पा पूर्ण केला.