हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी दुचाकी भाड्याने देणारी कंपनी बाऊन्सचे काम हळूहळू ट्रॅकवर परत येत आहे. आता कंपनी नवीन सब्सक्रायबर आणि दररोज रेंटल प्लॅन्ससह सेकंड हँड स्कूटर आणि बाइक्सची विक्री करीत आहे. कंपनी 5 वर्षांपेक्षा कमी चाललेल्या दुचाकी वाहनांवर 13,000 रुपयांपर्यंतची सवलत देत आहे. बाऊन्सजवळ अशाच एका सेकंड हँड गाडीचीची किंमत 22,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यलो नंबर प्लेटसह 2017 मॉडेलचे हे स्कूटर 40,000 किमीपेक्षा कमी धावले आहे. बाऊन्स म्हणतात की, रजिस्ट्रेशनची सुविधा घरीच उपलब्ध करुन दिली जाईल.
कंपनी इंजिनवर 6 महिन्यांची देत आहे वॉरंटी
बाऊन्स स्कूटरच्या इंजिनवर सहा महिन्यांची वॉरंटी देत आहे. या सेकंड हँड स्कूटर किंवा दुचाकींवर कोठेही बाउन्सचे ब्रॅण्डिंग केलेले नाही आहे. एवढेच नाही तर कोणतीही समस्या असल्यास आपण 15 दिवसांच्या आत स्कूटर एक्सचेंज देखील करू शकता. यासह बाऊन्स बंगळुरुमध्येही विनामूल्य शिपिंग सुविधा देत आहेत. होंडाच्या डीईओ स्कूटरच्या विम्यावर तुम्हाला अतिरिक्त 3,000 रुपये द्यावे लागतील. मात्र हा विमा नंतर देखील उतरविला जाऊ शकतो.
1.5 लाखात मिळतेय हार्ले-डेव्हिडसन स्ट्रीट 750
बाऊन्स प्लॅटफॉर्मवर हार्ले-डेव्हिडसन स्ट्रीट 750 देखील उपलब्ध आहे. ती 57,300 किमी धावली आहे. त्याची किंमत 1.50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या बाईकसह बाऊन्सकडून फ्री रजिस्ट्रेशनची ऑफर देण्यात आली आहे. त्याचबरोबर या बाइकची डिलिव्हरी खरेदीनंतर 10 दिवसांनी केली जाईल. बाऊन्स सर्व स्कूटर्स आणि बाइक्स वर ईएमआयची सुविधा देखील देत आहे. बाऊन्स या स्कूटर्स आणि बाईक्सना सॅनिटाइज केल्यानंतरच डिलिव्हर करीत आहेत.
छोट्या कंपन्यांनाही मिळत आहेत सर्व ऑफर
या सर्व सेकंड-हँड दुचाकींचे नूतनीकरण करण्यात आले आहे, अर्थात कंपनीने या दुचाकींमध्ये सर्व मोठ्या आणि आवश्यक त्या दुरुस्ती केलेल्या आहेत. बाऊन्स वैयक्तिक खरेदीदार तसेच कंपन्यांना या सर्व ऑफर देत आहे. टीव्हीएस स्कूटी झेस्ट सारख्या स्कूटर्स बाउन्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत, जे छोट्या कंपन्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. फक्त एवढेच नाही तर तुमची इच्छा असल्यास तुम्ही बाऊन्स प्लॅटफॉर्मवर खरेदी केलेल्या तुमच्या रीफर्बिश्ड टू-व्हीलरला रेंटनेही देऊ शकता. अशा प्रकारे, आपली दुचाकी आपल्याला पैसेही मिळवून देईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.