मुंबई प्रतिनिधी| राष्ट्रवादीचे श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना प्रवेशाबद्दल चर्चा केली आहे. सुनील तटकरे म्हणजे त्यांच्या चुलत्या सोबत त्यांची तेढ निर्माण झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेटली आणि शिवसेना प्रवेशाचा मनसुबा बोलून दाखवला. त्याला उद्धव ठाकरेंनी दुजोरा दिला असून येत्या काही दिवसातच अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार आहेत.
उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर अवधूत तटकरे यांना माध्यमांनी घेरले. तेव्हा त्यांनी आपण दोन दिवस विचार करून आणि कार्यकर्त्यांसोबत विचारविमर्श करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेणार आहे असे अवधूत तटकरे यांनी म्हणले आहे. सुनील तटकरे यांच्या वर्चस्वाला हा खूप मोठा धक्का असल्याचे मानले जाते आहे. अवधूत तटकरे यांनी शिवसेना प्रवेश केल्यास सुनील तटकरे यांचे पक्षातील वजन देखील कमी होणार असल्याचे बोलले जाते आहे.
दरम्यान सुनील तटकरे हे देखील पक्षाच्या धोरणावर नाराज आहेत. त्यामुळे ते देखील पक्षांतराच्या तयारीत आहेत. अशा बातम्या सध्या माध्यमातून झळकू लागल्या आहेत. तसेच या बाबीचा सुनील तटकरे यांनी नेहमीच इन्कार देखील केला आहे. मात्र त्यांच्या देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत गुप्त बैठका अधून मधून सुरु आहेत असे देखील बोलले जाते आहे.