व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन

कराड | राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. रोहित पवार हे आपल्या वडिलांसोबत कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कराडला थांबून यशवंतराव चव्हाण याना अभिवादन केलं.

भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी त्यांच्यासोबत कोणताही कार्यकर्ता तिथे उपस्थित नव्हता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यानंतर अजित पवार सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार यांनी सुद्धा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी या मार्गावरून जाताना अभिवादन करण्याची प्रथा सुरू ठेवली आहे.

रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते शरद पवार यांचे नातू आहेत. सध्या ते कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, दरवर्षी राज्यभरातील विविध नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन करतात.