Thursday, October 6, 2022

Buy now

आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही; दानवेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर भाजपचे नेते आणि तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच मुळची शिवसेना आहे. 25 वर्ष आम्ही युती केली ठाकरेंना वाटलं आपलं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांनी साथ सोडली. आम्ही आता परत कधी ठाकरेंच्या दारात जाणार नाही, असे दानवेंनी म्हंटले आहे.

रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, येत्या लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात भाजपचं मिशन 45 नाही तर मिशन 48 असणार आहे. आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व 48 जागांवर विजय मिळवणार आहोत,आम्ही आता नवीन मित्र जोडले आहेत.

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही. त्यामुळे आमच्यासोबत युती करत कोणाला यायचं असेल तर या आम्ही नाही म्हणाण नाही, असे ठाकरेंच्या बाबतीत दानवे यांनी म्हंटले.