राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला वाढता विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या 1 मेच्या सगळे विरोधात विविध राजकीय पक्ष संघटनांनी जिल्हाधिकारी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन सभेला परवानगी नाकारण्याचे मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पॅंथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर एक्शन कमिटी निकाल निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली.

आंतर सेनेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, ठाकरे यांचे भाषण चिथावणीखोर असते त्यांच्या सभांना आणि भाषणांना राज्यभर बंदी आणावी. यांच्या सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या निवेदनावर बंटी सदाशिवेंसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर प्रहार जनशक्ती पक्षाने पोलीस आयुक्तांना निवेदनात म्हटले आहे की, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह सर्वच जातीय धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय नेत्यांचा सभासदांना परवानगी देऊ नये. कोरोनानंतर सर्वसामान्य नागरिक दैनंदिन व्याप सांभाळताना हतबल झालेला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक स्वास्थ्य खराब होणे योग्य नाही.

गब्बर ॲक्शन कमिटीने ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले, तर राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक आघाडीचे सरचिटणीस सय्यद रफिक यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन ठाकरे यांनी हिंदू मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले.

मनसेकडून सभेची जय्यत तयारी –
1 मेच्या सभेला पोलीस परवानगी मिळावी यासाठी मनसेने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन अर्ज दिला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान आज मनसेचे नेते दिलीप धोत्रे, संतोष नागरगोजे, प्रकाश महाजन, अशोक तावरे, सतनाम सिंग गुलाटी सभेच्या तयारीनिमित्त सकाळी दहा वाजेपासून पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. शहरातील तीन आणि ग्रामीण मधील सहा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या सुभेदारी विश्रामगृह येथे बैठका होतील, असे जिल्हा अध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी कळवले आहे.

Leave a Comment