हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात आता काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. सिद्धरामय्या यांनी आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असून त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने कर्नाटक राज्य सरकारने गृहलक्ष्मी योजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.नुकतीच कर्नाटक राज्यात निवडणूक झाली होती त्यावेळी काँग्रेसने मतदारांसमोर गृहलक्ष्मी योजनेची मूळ संकल्पना सांगितली होती . त्या योजनेनुसार कर्नाटकात सरकार स्थापन झाल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला (Gruha Lakshmi Yojana) गृहलक्ष्मी योजने अंतर्गत दरमहा 2000 रुपये दिले जातील, असे आश्वासन काँग्रेसच्या वतीने देण्यात आलं होते. आता कर्नाटकात काँगेस सरकार स्थापन झाल्यावर आपण दिलेल्या आश्वासनांना पूर्ण करत (Gruha Lakshmi Yojana) गृहलक्ष्मी योजना अंमलात आणत आहे.
गृहलक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना किती पैसे मिळतील (Gruha Lakshmi Yojana)
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जनतेला आकर्षित करण्यासाठी आश्वासनांचा पाढाच वाचला होता. त्यावेळी कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर गृहलक्ष्मी योजना राबवणार असल्याचे पक्षाने सांगितले होते. या योजनेत घरातील महिलांना दरमहा 2,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल असे घोषित करण्यात आले होते. हिमाचल प्रदेशातही काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी योजना लागू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही योजना आधीच लागू केली होती .त्याच धर्तीवर कर्नाटकातही हि योजना राबवण्यात येण्याची घोषणा करत मतदारांना आकर्षित करण्याचा काँगेसचा डाव यशस्वी झाल्यावर आता त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार (Gruha Lakshmi Yojana) गृहलक्ष्मी योजना सुरु करत आहे.
पैसे थेट होतील महिलांच्या खात्यात जमा
गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीमुळे कर्नाटकातील महिलांना फायदा होणार आहे. ह्या योजनेअंतर्गत घरात मुख्य असणाऱ्या महिलेला दरमहा 2000 रुपये दिले जातील. कर्नाटक सरकार हे पैसे थेट कुटुंबातील प्रमुख महिलेच्या खात्यात जमा करणार आहे. गृहलक्ष्मी योजनेच्या मदतीने प्रत्येक महिलेला मिळालेली रक्कम घरगुती जीवनावश्यक वस्तू आणि एलपीजीच्या किमतीत होणारी वाढ यांसारख्या समस्यांना तोंड देताना सहाय्य करेल . असे कर्नाटक सरकारचे मत आहे . कर्नाटकांत 1.5 कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे.
गृहलक्ष्मी योजना कोणाला दिली जाणार आहे ते जाणून घेण्यासाठी खालील वेबसाईटवर जाऊन सदर माहिती व्यवस्थित वाचून फॉर्म सबमिट करावा (https://pmmodiyojana.org/ ) गृहलक्ष्मी योजने अंतर्गत कुटुंबातील फक्त एक महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
काय आहे पात्रता –
अर्जदार कुटुंबाचा प्रमुख असणे आवश्यक आहे.
अर्जदार कर्नाटकचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
आवश्यक कागदपत्रे-
गृहलक्ष्मी योजनेसाठी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा सरकारने घोषित केलेले कोणतेही ओळखपत्र इत्यादी कागदपत्रं जमा करणे अनिवार्य आहे .