हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Ticket : भारतीय रेल्वेला देशाची जीवन वाहिनी म्हंटले जाते. आजही देशभरातील लाखो लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. रेल्वे देखील प्रवाशांना तिकिटांच्या बाबतीत अनेक सुविधा देते. यामुळे प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार तिकीट बुक करतायेतात तसेच त्यांना हवे तेव्हा तर तिकीट रद्द देखील करता येते. मात्र हे लक्षात घ्या कि, रेल्वेच्या तिकिटांवरही GST द्यावा लागतो. मात्र, आता प्रश्न असा उपस्थि होतो की, तिकीट रद्द केल्यानंतरही प्रवाशांना जीएसटी द्यावा लागेल का??? तसेच एकदा तिकीट रद्द केल्यानंतर तिकीट बुकिंगच्या वेळी घेतलेला जीएसटी परत केला जाईल का??? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेउयात…
रेल्वेच्या नियमांनुसार, रेल्वेचे तिकीट बुक करताना आकारला गेलेला जीएसटी तिकीट रद्द करताना प्रवाशांना परत केला जातो. रेल्वे मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, बुकिंगच्या वेळी आकारण्यात आलेला जीएसटी तिकिटाच्या किंमतींसहीत परत केला जाईल. इथे हे जाणून घ्या की, फक्त एसी आणि फर्स्ट क्लासचे तिकीट रद्द केल्यावरच जीएसटी शुल्क लागू होईल. यावरील जीएसटी दर 5 टक्के आहे. Train Ticket
कोणत्या तिकिटावर किती कॅन्सलेशन चार्ज द्यावा लागेल ???
हे जाणून घ्या कि, तिकीट रद्द केल्यानंतर रेल्वे विभागाकडून थोडा कॅन्सलेशन चार्ज आकारला जातो, जो त्याच्या रिफंडच्या नियमांनुसार लागू होतो. सध्याच्या नियमांनुसार, ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी कन्फर्म तिकीट रद्द केले तर एसी फर्स्ट क्लाससाठी 240 रुपये, एसी टायर 2 साठी 200 रुपये, एसी टियर 3 आणि चेअर कारसाठी 180 रुपये, स्लीपर क्लाससाठी 120 रुपये आणि सेकंड क्लासच्या तिकिटांवर 200 रूपये कॅन्सलेशन चार्ज 60 रूपये आकारले जाते.Train Ticket
याच बरोबर ट्रेन सुटण्याच्या 12 तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीट भाड्याच्या 25 टक्के रक्कम कॅन्सलेशन चार्ज म्हणून आकारली जाते. दुसरीकडे, ट्रेन सुटल्यानंतर 4 तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास 50 टक्के कॅन्सलेशन चार्ज वसूल केला जातो. Train Ticket
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://erail.in/railway-ticket-cancellation-charges
हे पण वाचा :
‘या’ Penny Stock ने गेल्या 1 वर्षातच गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Multibagger Stock : अवघ्या 12 हजारांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदारांना मिळाले 1 कोटी रुपये
Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
TAN Card म्हणजे काय ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या