महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांचे ट्विट; म्हणाल्या, नंगानाच करत फिरतीये तिला..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद प्रकरणावरून राज्य महिला आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ याना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. यांनतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी असं म्हणत स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार अशा शब्दात चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर..! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही अशी भूमिका घेणारीला पाठवली…असो.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र … असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

महिला आयोग नेमकं काय म्हणालं होतं-

उर्फी जावेद वरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली आहे, महिला आयोगाची गरिमा राखली नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे. चित्रा वाघ यांना १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी याप्रकरणी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा महिला आयोगा कडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा थेट इशाराही त्यांनी दिला.

गुरुवारी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत खोटी आणि चुकीची माहिती दिली, महिला आयोगानं तेजस्विनी पंडित हिला कधीही नोटीस पाठवली नाही. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती. चित्रा वाघ आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिला आयोगाविरोधात भूमिका घेत आहेत असा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला.