हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता चांगलीच त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले आहे. अशात आता सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहार. तो म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच केंद्र सरकारची एक बैठक पार पडली. या 47 व्या GST बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे 18 जुलै 2022 पासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवन्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने GST बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी दर वाढवले जाणार आहेत. त्यामध्ये पनीर, लस्सी, बटर मिल्क, पॅकेज केलेले दही, गव्हाचे पीठ, कडधान्ये, मध, पापड, तृणधान्ये, मांस आणि मासे यांचाही समावेश असणार आहे.
पॅकेज केलेल्या लेबलांसह कृषी मालाच्या किंमतीतही18 जुलैपासून वाढ होणार आहे. कारण बैठकीत या उत्पादनांवरील करात वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ब्रँडेड आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो. एकंदरीत बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक भुर्दड बसणार हे मात्र, नक्की !