कोरोना जनजागृतीसाठी बेळगावात उभारली मास्क घातलेली गुढी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
मराठी नवीन वर्ष अर्थात गुढीपाडव्याचा सण नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. यंदा देशभर कोरोनाच संकट घोंगावत असताना देखील हा सण महाराष्ट्र बरोबर कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलाय. यंदाच्या गुढीपाडवा सणाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्नाटकातल्या बेळगाव शहर शहरातील उभारलेली एक आकर्षक गुढी.

आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन आहे. गुढी ही गुढी सारखीच असणार. तर नाही ही गुढी आहे कोरोना विरोधातली आहे. करोना पासून सर्वांचे रक्षण व्हावं यासाठी उभारलेली आहे. अर्थात या गुढीला मास्क लावाण्यात आलेल आहे. बेळगाव शहरातील भारत नगर वडगाव येथील राजेंद्र कोळेकर यांच्या घरी गुढी उभारली आहे. काळजी घ्या बाहेर पडू नका घरातच थांबा, कोरोनाला थांबवा असा संदेश त्यांनी दिला आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment