भाजपाला मोठा धक्का! गुजरातमध्ये निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा

jay narayan vyas
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – गुजरात विधानसा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून गुजरातमध्ये राजकीय घडमोडींना वेग आला आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या चाचपणी प्रक्रियेत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्या सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मागील तीन दशकांपासून भाजपामध्ये असलेले तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भुषवलेले जय नारायण व्यास (jay narayan vyas) यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेस किंवा आप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जय नारायण व्यास (jay narayan vyas) हे मागच्या 30 वर्षांपासून भाजपात होते. या काळात त्यांना मोदी तसेच केशुभाई पटेल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळले होते. मात्र त्यांना यावेळी पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याची शक्यता बळावताच त्यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच ते आगामी काळात गुजरात किंवा आप पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जय नारायण व्यास यांनी राजीनाम्यात त्यांनी वैयक्तिक कारणामुळे मी राजीना देत आहे, असे लिहिलेले आहे.

जय नारायण व्यास यांची कारकीर्द
व्यास (jay narayan vyas) यांनी 1998 आणि 2000 साली पाटण जिल्ह्यातील सिधपूर विधानसभा मतदासंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. यावेळी त्यांना याच जागेवरून निवडणूक लढवायची आहे. मात्र 2002, 2012, 2017 साली त्यांना या मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागलेला होता. 2002 आणि 2017 याच मतदारसंघातून बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून व्यास यांचा पराभव केला होता. ह्यामध्ये विशेष गोष्ट अशी कि बलवंतसिंह राजपूत आता भाजपमध्ये आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी