‘तू माझ्यासोबत फार वाईट केलं, असं करायला नको होतं’ म्हणत तरूणीची आत्महत्या

suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुजरात : वृत्तसंस्था – पतीवर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या गुजरातमधील आयशाच्या आत्महत्येने (suicide) सर्वांनाच धक्का दिला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून आयशाने साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली होती. आता आयशाप्रमाणे बडोद्याच्या नफीसाने साबरमती रिव्हर फ्रंटवर आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला होता. यादरम्यान तिने एक व्हिडीओ बनवला होता. यावेळी तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता अखेर शेवटी तिने मृत्यूला कवटाळलेच.

मृत नफीसाने आत्महत्येचा (suicide) प्रयत्न करण्याआधी एक व्हिडीओ बनवला होता. यात तिने अहमदाबादच्या शेख रमीझ अहमदचा उल्लेख केला होता. प्रेमात दगा मिळाल्यानंतर तिने या व्हिडीओत तिची वेदना व्यक्त केली. यावेळी तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि आपल्या घरी बडोद्याला परत गेली. यानंतर अखेर शेवटी तिने 20 जूनला घरातच गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी जीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, मृत्यूआधी तिने एक व्हिडीओ बनवला होता.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
नफीसा व्हिडीओ म्हणत आहे कि, ‘रमीझ…तू माझ्यासोबत फार वाईट केलं. असं करायला नको होतं. आयुष्यात मी सर्वात जास्त प्रेम तुझ्यावर केलं आणि तू माझ्यासोबत असं केलं? मला इतका मोठा दगा दिला. मला वाटलं, तू वेगळा आहे. पण तू सुद्धा इतरांसारखाच आहे. तुझ्यात आणि इतरांमध्ये काहीच फरक नाही. सगळ्या जगाला समजल्यानंतरही तू माझा हात हाती घेतला नाही. तू खूप वाईट आहे…’.

हे पण वाचा :
‘तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा’ इंदोरीकर महाराजांनी कार्यकर्त्यांना सुनावले

शिवसेना बाळासाहेब!! शिंदे गटाचे नाव ठरलं

आमच्या झमेल्यात पडू नका, नाहीतर उरली सुरली प्रतिष्ठा गमावाल

शिवसैनिक आक्रमक!! बंडखोर आ. तानाजी सावंत यांना गद्दार म्हणत कार्यालयाची तोडफोड

मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! बंडखोर आमदार योगेश कदम यांचं ट्विट