हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मी २० आमदार घेऊन गेलो होतो. पण त्यांनी ऐकलं नाही. उद्धव ठाकरेंनी तेव्हा तह केला असता तर आज ही वेळ आली नसती असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही जे केलं आहे ते शिवसेना वाचवण्यासाठी केलं आहे असेही त्यांनी म्हंटल.
गुलाबराव पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंकडे मी २० आमदार घेऊन गेलो होतो. मी काय सर्वात पहिला गेलेलो नाही. ३२ आमदार गेल्यानंतर ३३ वा मी गेलो. मी उद्धव ठाकरेंना भेटून गेलोय. मी त्यांना सांगितलं होत कि हे सगळं असं असं चाललं आहे, त्यावर त्यांनी दुरुस्ती केली असती तर बर झालं असत. शिवाजी महाराज ही युद्धामध्ये तह करायचे तसाच तह उद्धव ठाकरेंनी केला असता तर आज ही वेळ आली नसती.
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यावरूनही टीका केली. अडीच वर्षांपूर्वीच तुम्ही जर असे फिरला असता तर आज ही वेळ आली नसती. ३२ वर्षाचे तरुण आहेत ते.. त्यांनी मंत्री असताना राज्यभर फिरायला हवं होत हीच आमची अपेक्षा होती. पण त्या काळातील अपेक्षा ते आता पूर्ण करत आहेत, परमेशवर त्यांचं भलं करू असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत असा पुनरुच्चारही त्यांनी केला.