उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या सरपंचावर गोळीबार, थोडक्यात बचावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादमधील फक्राबादचे राष्ट्रवादीचे सरपंच नितीन बिक्कड (Sarpanch Nitin Bikkad) यांच्या गाडीवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या (Sarpanch Nitin Bikkad) गाडीवर 2 गोळ्या झाडल्या आहेत. सुदैवाने या गाडीमधील कोणालाही कसलीच इजा झाली नसून सगळे सुखरूप आहेत. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कल रात्री 9 वाजताच्या सुमारास हि घटना घडली.

काय घडले नेमके ?
सरपंच नितीन नितीन बिक्कड (Sarpanch Nitin Bikkad) हे पेट्रोल पंपाच्या कामानिमित्ताने अशोक शिनगारे यांच्या भेटीसाठी गावात गेले होते. त्यावेळी ते चौकामध्ये लोकांसोबत चर्चा करत होते. त्यानंतर शिनगारे यांनी घरीच भेटण्यासाठी बोलावले होते. त्यामुळे नितीन बिक्कड (Sarpanch Nitin Bikkad) हे त्यांच्या घराकडे निघाले होते. फक्राबाद शिवारातील येताळ या ठिकाणी पोहोचताच दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले आणि त्यांनी नितीन बिक्कड यांना गाडीची काच खाली करण्यास सांगितले.

यानंतर काही कळायच्या आत मास्क घातलेल्या एका तरुणाने गाडीच्या दिशेनं गोळीबार केला. गाडीच्या समोरील काचेला गोळी लागली. त्यानंतर नितीन बिक्कड (Sarpanch Nitin Bikkad) यांनी स्वत: चा जीव वाचवण्यासाठी गाडी जोरात चालवली. त्यानंतरही पाठीमागून हल्लेखोराने आणखी एक गोळी झाडली. त्यानंतर नितीन बिक्कड (Sarpanch Nitin Bikkad) यांनी आरोग्य केंद्रावर जाऊन उपचार घेतला. या हल्ल्याप्रकरणी वाशी पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा :
हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या : सासूसह चाैघांवर गुन्हा दाखल

मोदींच्या आईचे 100 व्या वर्षात पदार्पण; पाय धुवून मोदींनी घेतले आशीर्वाद

IND vs SA: हार्दिक पांड्याने दिला ‘हा’ सल्ला आणि Dinesh Kartikनं 16 वर्षांनी रचला इतिहास

सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची फसवणूक; ‘एवढ्या’ लाखांचा घातला गंडा

बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण

Leave a Comment