गांधींजींचे विचार संपले, आता नथूरामांचे विचार..; सदावर्ते पुन्हा बरळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली. परंतु या सभेमध्ये तुफान राडा देखील झाला. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने निषेध नोंदवत सभेत राडा घातला. मुख्य म्हणजे, आता हा सर्व राडा गुणरत्न सदावर्ते यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून हॉटेलमध्ये बसून पाहिला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यवतमाळमध्ये झालेल्या राड्यावर आणि आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी म्हणले आहे की,  “शरद पवारांचे बगलबच्चे तांदळा एवढ्या खड्याइतके होते. गोंधळ वगैरे काही करू शकले नाहीत. तोंडातून शब्दही बाहेर पडले नाहीत. अत्यंत घाणेरडी कृती आहे. संदीप शिंदेंना धडा शिकवण्याची गरज आहे. ज्या अहवालावर प्रभू राम चंद्रांचा फोटो, हिंदू राष्ट्रभारत लिहिलेला आहे, त्या अहवालावर हात लावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून झोडपून बाहेर काढलेलं आहे”

गांधींजींचा विचार आता काहीच…

त्याचबरोबर, “नथूराम गोडसेंची अखंड भारताची भूमिका आजही हिंदूस्थानी काळजात ठेवून आहे. गांधींजींचा विचार आता काहीच शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहे. पाकिस्तान दिल्याचा विषय शिल्लक नाही. नथूरामांचे विचार काँग्रेसी विचार संपवू शकत नाहीत, थातूर मातूर तुटक्या मुटक्या विचारांचे तर अजिबात संपवू शकत नाहीत. शरद पवारांचा विचार नथूराम गोडसेच्या पायाच्या धुळी इतकाही नाही, असं माझं स्पष्ट मत आहे” असे थेट भाष्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं आहे.

दरम्यान, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची जी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती त्याच्या  अहवालावर नथुराम गोडसे यांचा फोटो छापण्यात आला होता. यापूर्वी देखील गुणवंत यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो आपल्या बैठकांमध्ये वापरला होता. ज्यामुळे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने काल सभेत राडा घातला. यानंतर माध्यामांशी बोलताना स्वतः, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी यासर्व प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले.

संदीप शिंदे यांनी यांनी म्हणले की, “नथुराम गोडसेचं उदात्तीकरण महाराष्ट्रात किंबहुना देशात खपवून घेतलं जाणार नाही. नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यामुळे आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गुणरत्न सदावर्ते यांना येता देखील आलं नाही. आजच्या सभेवेळी त्यांच्या खुर्च्या देखील रिकाम्या होत्या”