गुणरत्न सदावर्तेना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज सदावर्ते यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्यांना आज दुपारी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालीयन काेठडी सुनावली.

सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांची चार दिवसाची आज पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार कि न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज दुपारी पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयात पोलिसांनी हजर केले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/664796248147686

यावेळी पार पडलेल्या सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना न्यायालीयन काेठडी सुनावली. आज जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने आता सदावर्ते यांना सातारा पोलिसांकडून सदावर्ते यांची आर्थर रोड कारागृहात घेवून जाणार आहेत. दरम्यान, आज सकाळी पाेलीस सदावर्तेंना कोठडीतून शहर पोलिस ठाण्याकडे नेत असताना सदावर्ते यांनी ‘वंदे मातरम्, भारत माता की जय, जुल्म कधी जिंकत नसतो,’ अशा घाेषणा देत सत्याचा विजय हाेणार, असे म्हटले हाेते.

नेमकं प्रकार काय?

दीड वर्षांपूर्वी सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्य प्रकरणी पोलिसांकडून या गुन्ह्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अ‍ॅड. सदावर्तेना दि. 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा पोलिसांनी सदावर्तेंना न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली होती. परंतू न्यायालयाने ही मागणी फेटाळली. तसेच त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Leave a Comment