लॉकडाउनमध्ये गाडीच्या बोनटवर कोयत्याने कापला केक; माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशचे माजी आमदार भगवान शर्मा उर्फ ​​गुड्डू पंडित यांनी ईस्टर्न पॅरीफेरल एक्सप्रेस वेवर आपल्या एका समर्थकांचा वाढदिवस साजरा केला होता. पंडित आणि त्यांच्या समर्थकानीं यावेळी कोरोना संकटामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत कोयत्याने केक कापल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर आता पंडित यांच्यावर दादरी कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती झोन ३ चे डीसीपी राजेश सिंग यांनी दिली आहे.

गुड्डू पंडित यांनी आपल्या समर्थकांसह गाडीच्या बोनटवर कोयत्याने केक कापला. यावेळी २० हुन अधिक लोक तेथे उपस्थित होते. मात्र यातील कोणीही तोंडाला मास्क लावलेला न्हवता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दादरी कोतवाली पोलिसांनी माजी आमदार आणि २० अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे जिल्ह्यात कलम १४४ लागू असून सामाजिक अंतर पाळण्याचे व तोंडाला मास्क लावून बाहेर जाण्याचे कडक आदेश आहेत. मात्र माजी आमदार पंडित यांनी या आदेशांचे पालन न करत गर्दी जमावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, माजी आमदार गुड्डू पंडित यांनी रविवारी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की आज त्यांचा वाढदिवस नाही. 10 जुलै रोजी त्याचा वाढदिवस आहे. सोमवारी व्हायरल झालेला व्हिडीओ हा आपल्या वाढदिवसाचा नसून मी द्रुतगती मार्गावरुन जात असताना काही तरुण वाढदिवस साजरा करताना दिसले. तेव्हा मी गाडी थांबवून त्यांना रोखले आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याबाबत त्यांना सांगितले. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्याने आपलाच वाढदिवस असल्याचा गैरसमज काहींचा झाला असून ते चुकीचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.