व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! बहिणीसोबत संबंध ठेवल्याने भावाने केली मित्राची हत्या

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून एकाचा खून (Murder) झाला होता. हि घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अनैतिक संबंधामधून खून झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. यामध्ये आपल्या हिणीसोबत संबंध ठेवल्याची माहिती कळाल्यावर भावाने धावत्या दुचाकीवर मित्राची चाकूने वार करुन हत्या (Murder) केली आहे.

नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी रात्री 11 च्या दरम्यान बीडच्या मंझेरी शिवारातील शांतीवन नजीक हि धक्कादायक घटना घडली आहे. हत्या (Murder) केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. मात्र बीड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच, आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मित्राच्या बहिणीसोबत जुळले सूत
ब्रम्हदेव हनुमान कदम असे मृत तरुणाचे नाव आहे तर लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर पांडुरंग बहिरवाळ असे आरोपी तरुणाचे नाव आहे. मृत ब्रम्हदेव कदम हा अविवाहित असून शेती करायचा. तर आरोपी मित्र लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वरची बहीण सासरी नांदत नसल्यामुळे माहेरी आली होती. लक्ष्मण आणि ब्रह्मदेव हे चांगले मित्र असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. यादरम्यानच लक्ष्मणची बहीण आणि ब्रम्हदेवचे प्रेमसंबंध जुळले. यानंतर प्रेमप्रकरणाची भनक लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वरला लागली.

घटनेच्या दिवशी दोघे हॉटेलमध्ये एकत्र जेवले आणि….
घटनेच्या रात्री हे दोघेजण पालीनजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवले. यानंतर मृत ब्रह्मदेव कदम आणि आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर बहिरवाळ हे दोघे मंजिरी गावाकडे जात होते. यावेळी शांतीवन नजीक आल्यानंतर आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर याने धावत्या दुचाकीवर ब्रह्मदेव याच्या पोटात चाकूने सपासप वार त्याची निर्घृणपणे हत्या (Murder) केली. यानंतर आरोपी मृत ब्रह्मदेव याची गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब