वजन कमी करण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने तरुणीला दिलं वेगळंच इंजेक्शन आणि त्यानंतर…

rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लुधियाना : वृत्तसंस्था – जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं वजन कमी करण्याच्या नावाखाली एका तरुणीवर बलात्कार केला आहे. आरोपी ट्रेनरनं वजन कमी करण्याचं इंजेक्शन देण्याच्या बहाण्यानं पीडित तरुणीला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन दिले आहे. हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडित तरुणीचे अश्लील फोटोसुद्धा काढले आहे. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने 5 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. यानंतर पीडित महिलेनं लुधियाना पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

या आरोपी तरुणाचे नाव धर्मेंद्र जोशी असे आहे. तो लुधियानातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. आरोपीने एका 40 वर्षीय पीडित महिलेला वजन कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच त्याने लवकरात लवकर सडपातळ व्हायचं असेल तर इंजेक्शन घ्यावं लागेल, असा उपायसुद्धा आरोपी ट्रेनरनं पीडितेला सुचवला होता. हि महिला आरोपी ट्रेनरच्या आमिषाला बळी पडत इंजेक्शन घ्यायला तयार झाली.यानंतर आरोपी ट्रेनरनं वजन कमी करण्याचं इंजेक्शन असल्याचं भासवत महिलेला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन टोचलं. यामुळे पीडित महिला बेशुद्ध झाली.

यानंतर आरोपीनं घृणास्पद कृत्य करत पीडितेवर अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडितेचे अश्लील फोटोसुद्धा मोबाइलमध्ये काढले आहेत. हा नराधम आरोपी ट्रेनर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. यानंतर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं लुधियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.