हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना लसीच्या तुटवड्या मुळे चिंता निर्माण झाली होती. अखेर आपल्याला दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली. आपल्या विनंतीचा स्वीकार करत केंद्राने परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांचे आभार मानले
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 15, 2021
याआधी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या मागणीची नोंद पंतप्रधान मोदी यांनी घेतली. यानंतर पंतप्रधानांच्या आदेशानुसार एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. या समितीने हाफकिन संस्थेला कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी परवानगी देता येईल का आणि त्यात काही कायदेशीर अडचणी असल्यास त्या कशा सोडवता येतील याबाबत अहवाल दिला. या अहवालाआधारे हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page