केसगळतीने चिंतीत आहात? करा ‘हे’ घरगुती उपाय

hair fall remedy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडच्या काळात पुरुष आणि महिला दोघांमध्ये केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. केस गळून टक्कल पडल्याने अनेक पुरुषांच्या मनात न्यूनगंड पण निर्माण होतो. केस गळण्यामागे अनेक कारणे आहेत. केसगळतीवर उपाय म्हणून अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे तेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेत असतात. काही जण तर लेझर ट्रीटमेंट देखील करतात परंतु त्याचा फारसा फरक पडताना दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही केसगळतीवर मात करू शकता.

मेथीचे दाणे-

एक कप मेथीच्या दाण्याने ही घरगुती रेसिपी बनवता येते. हे धान्य केसांच्या फॉलिकल्सची दुरुस्ती करतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात. याशिवाय यामध्ये आढळणारे प्रोटीन आणि निकोटिनिक अॅसिड केसांना मजबूत करतात. यासाठी एक कप मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना बारीक करून पेस्ट बनवा. ही तयार पेस्ट केसांना हेअर मास्कप्रमाणे लावा आणि 30 ते 40 मिनिटे ठेवल्यानंतर धुवा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा प्रयोग करून तुम्ही केसगळतीवर नियंत्रण ठेऊ शकता.

जास्त शांपू वापरू नका-

केस गळतीवर उपाय म्हणून जास्त शाम्पूचा वापर करू नये. कारण तुमचे केस आधीच कोरडे असतील तर जास्त शांपू वापरल्याने तुमच्या केसांची आर्द्रता कमी होऊ शकते. यामुळे तुमच्या केसांना नुकसान होण्याची शक्यताही असते.

कांदा –

घरात अगदी सहज उपलब्ध असणारा कांदा डोक्याला लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस गळणे थांबते. त्यासाठी एका भांड्यात कांदा किसून घ्या किंवा रस करा. हा रस बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांमध्ये लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. उरलेला रस केसांच्या टोकांना लावा. अर्धा तास ठेवल्यानंतर केस धुवा. यामुळे केसगळती थांबेल.

आवळ्याचा रस –

व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला आवळा केसांची जलद वाढ आणि केस गळती रोखण्यासाठी उपयुक्त मानला जातो. केसांना आवळ्याचा रस लावल्याने केस जाड आणि मजबूत होण्यास मदत मिळते तसेच केसांची वाढ देखील जास्त होते. त्यासाठी एक चमचा आवळा पावडर घ्या आणि पाण्याने पेस्ट तयार करा. त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाका. ही पेस्ट केसांना लावून 35 ते 40 मिनिटे ठेवा आणि नंतर डोके धुवून केस स्वच्छ करा.