हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी

Haji Ali Dargah
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सण, उत्सव व काही विशेष दिनादिवशी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला होण्याची भीती असते. त्यासाठी गुप्तचर यंत्रणा कायम सतर्क असतात. खासकरून मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था हि पोलीस प्रशासनाकडून ठेवली जाते. मुंबईतील महत्वाच्या असलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुबंईत खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील सुरक्षा नियंत्रण कक्षाला नुकतीच एका अज्ञात व्यक्तीने हाजीअली येथे 17 अतिरेकी येणार असल्याची फोनवरून दिली आहे. माहिती मिळताच मुंबईतील पोलिसांनी हाजीअली येथील संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

पोलिसांनी नंतर ज्या नंबरवरून त्यांना फोन आला होता. त्या नंबरवर पुन्हा फोन केला असता तो बंद असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबधित फोन हा उल्हासनगरहून आला असल्याचे तपासात समोर आले असून पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. तरीही पोलिसांनी मुंबईतील इतर महत्वाच्या धार्मिक तसेच पर्यटन स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.