हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोर्नोग्राफीवरील सर्वेक्षणानुसार जवळपास निम्म्या मुलांनी किशोरवयात पोहोचेपर्यंत निम्म्या मुलांनी पॉर्न पाहिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. तसेच सर्वेक्षण केलेल्यांपैकी जवळपास निम्म्या तरुणांना असं वाटत कीं मुलींना लैंगिक आक्रमकतेची जास्त अपेक्षा असते. इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात इशारा देण्यात आला आहे की हानीकारक ऑनलाइन सामग्रीपासून तरुणांना वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगेला हवी.
या सर्वेक्षणानुसार, वयाचे 13 वे वर्ष हे पहिल्यांदा पोर्नोग्राफी पाहण्याचे ऍव्हरेज वय आहे. वयाच्या 9 व्या वर्षापर्यंत 10 टक्के मुले पॉर्न पाहतात. 27 टक्के मुले वयाच्या 11 व्या वर्षी पॉर्न पाहतात. तर सर्वेक्षणानुसार जवळपास 50 टक्के मुले वयाच्या 13 व्या वर्षी पॉर्न पाहतात. तरुण लोक वारंवार वाईल्ड पोर्नोग्राफी पाहतात ज्यामध्ये ज्यात जबरदस्ती, अपमानास्पद किंवा वेदनादायक लैंगिक कृत्यांचे चित्रण केले जाते.
या अहवालात असे आढळून आले आहे पॉर्नोग्राफी बघणारे यूजर्स शारीरिकदृष्ट्या आक्रमक लैंगिक कृत्यांमध्ये गुंतण्याची शक्यता असते. ऑनलाइन पोर्नोग्राफीमधील लैंगिक हिंसाचाराचे सामान्यीकरण आणि लैंगिक आणि नातेसंबंधांबद्दल मुलांच्या समजूतदारपणात ती भूमिका निभावत असल्याबद्दल या सर्वेक्षणात गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
सर्वेक्षणानुसार, मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर याठिकाणी सर्वाधिक टक्के मुलांनी (41 टक्के) पोर्नोग्राफी पाहिली होती. त्यानंतर समर्पित पोर्नोग्राफी साइट्स (37 टक्के), इन्स्टाग्राम (33 टक्के), स्नॅपचॅट (32 टक्के) आणि सर्च इंजिन (30 टक्के) यांचा क्रमांक लागतो.
भारतात पोर्नोग्राफीवर बंदी
भारत सरकारने नवीन IT नियम 2021 चे पालन करून पोर्नोग्राफिक वेबसाइट्सवर बंदी घातली आहे. तसेच सप्टेंबर 2022 मध्ये भारत सरकारने आणखी 63 पोर्नोग्राफिक वेबसाइट्स बॅन केल्या. याआधी 2018 मध्ये, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्राने पोर्नोग्राफिक कन्टेन्ट होस्ट करणाऱ्या ८२७ वेबसाइट ब्लॉक करण्यासाठी इंटरनेट सेवा पुरवठादारांना निर्देश दिले होते.