दापोली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मुरूड दापोली येथे बेकायदा उभारलेल्या बंगल्यावर जेसीबीने हातोडा मारत कारवाई सुरू केलेली आहे. अनाधिकृत बंगल्याचे बांधकाम तोडण्यास सुरूवात केली असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिअो ट्विट केला आहे. करून दाखविले ! मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला आता पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा असे ट्विटही केले आहे.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा बेकायदा बंगला आहे. या बेकायदा बंगल्यावर कारवाई करण्यासाठी ‘पर्यावरण मंत्रालय, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी यांना प्रश्न विचारले होते. ताबडतोब हे बांधकाम तोडावे, तसेच गुन्हा दाखल करावा. अन्यथा मला न्यायालयात जावे लागेल’, अशा इशाराही भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला होता.
करून दाखविले !!!!
मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले
पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा
उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार pic.twitter.com/azpHTiFHlQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 22, 2021
किरीट सोमय्या यांनी मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले. पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा असून उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार असल्याचे म्हटले आहे.