तांबवे येथील हणमंतराव पाटील मुंबई अग्निशमन दलातून वरिष्ठ प्रमुख अग्निशामक म्हणून सेवानिवृत्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तांबवे गावचे रहिवाशी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका “मुंबई अग्निशमन दलातील विक्रोळी अग्निशमन केंद्रातील कार्यरत वरिष्ठ प्रमुख अग्निशामक हणमंत उत्तम पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी अग्निशमन अधिकारी श्री. परब, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. हिरवाळे, वरिष्ठ अधिकारी श्री. शितोळे उल्हास राठोड, केंद्र अधिकारी श्री. सोनवणे, चितमन दळवी, प्रभाकर पेंगळेकर, विद्याधर चव्हाण, गणेश कुमावत यांच्यासह हणमंतराव पाटील यांच्या सुविद्य पत्नी सुशिला पाटील, चिरंजीव विक्रम पाटील आदी उपस्थित होते.

हणमंतराव पाटील 1991 – 92 या काळात निवड झालेली बॅंचमधील होते. त्यांना एका वर्षाचा अनुभव मिळतो न मिळतो तर 1993 ची दंगल संपुर्ण मुंबईमध्ये हाहाकार जिकडे तिकडे पेटलेली मुंबई पहायला मिळत होती. सबरच्या गाड्या आग विझवत सिटीपर्यंत पोहचल्या आणि सिटीच्या गाड्या पुर्व लाईन मुलुंडपर्यंत पोहचल्या अशा धावपळीच्या वेळेतील हे जवान वेगवेगळ्या ठिकाणी जनतेची सेवा करत होते.

अनेक सहकार्‍यांबरोबर काम करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. तरी सध्या कोविड १९ या कोरोना प्रादुर्भावातून चोवीस तास ड्युटी येण्या – जाण्याच्या प्रवासातून स्वतःला सुरक्षित ठेवले होते. आपल्या परिवारासह कोविड योद्धा म्हणून महानगरपालिका आयुक्तांनी सन्मानीत करुन संयमाने आपली सेवा यशस्वीरित्या पुर्ण करत वयाची “५८” वर्षे पुर्ण करुन सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत.

हणमंतराव पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, तांबवे गावचे सरपंच शोभाताई शिंदे, उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील, माजी प्राचार्य गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment