नवरदेवाच्या ‘पिवळ्या’ हातात बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – हळदीच्या समारंभात तलवारी, जांबिया हातात धरून मित्रांचा बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवा 6 त्याच्या सहा मित्रांना पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लग्नात लागलेल्या हळदीच्या पिवळ्या हातात बेड्या पडल्या मुळे पुंडलिक नगर परिसरात खळबळ उडाली आहे. नवीन मध्ये नवरदेव विभीषण शिंदे (29), यश साखरे (19), शेख बादशहा (29), शुभम मोरे (22), किरण रोकडे (22) आणि वसीम शेख (20) यांचा समावेश आहे.

पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी विभीषणच्या हळदीचा कार्यक्रम होता. वसीम शेख याने तलवार आणि शुभम मोरे याने दोन जांबिया बाहेर काढले. तलवार म्यानातून काढून हातात उंच धरत, बेधुंदपणे नवरदेवासह इतर मित्र नाचू लागले. या सर्व धिंगाणाचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. यानंतर काही वेळातच व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले. हे व्हिडिओ व्हायरल होत पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून निरीक्षक गांगुर्डे यांनी सहाय्यक निरीक्षक खटाणे यांच्या पथकाला संबंधितांना अटक करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर खटाणे, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, गणेश डोईफोडे, संतोष पारधे यांच्या पथकाने सर्वांना अटक केली.

Leave a Comment