हार्दिक पंड्याने दुसऱ्यांदा लग्न केलं; पहा खास Photos

hardik pandya wedding photos
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय T20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. मंगळवारी (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी लग्न केले. २०२० मध्ये हार्दिक आणि नताशाचे कोर्ट मॅरेज झाला होता, पण आता दोघांनी ग्रँड वेडिंग केले आहे. हार्दिक आणि नताशाला अगस्त्य नावाचा एक मुलगाही आहे.

hardik padnya wedding photos

हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने लिहिलं की, आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या प्रतिज्ञाची पुनरावृत्ती करून प्रेमाच्या या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे.” आमचे हे प्रेम आमच्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत साजरे करण्यात आम्ही खरोखरच धन्य आहोत.

hardik padnya wedding photos

हार्दिक आणि नताशा यांनी उदयपूर येथे ख्रिश्चन रितीरिवाजाने लग्न केले आहे. या लग्नसोहळ्याला अनेक क्रिकेटपटू आणि सिनेतारकांनी हजेरी लावली होती. हार्दिक पांड्या सोमवारीच उदयपूरला रवाना झाला होता.

hardik padnya wedding photos

हार्दिकने लग्नात पांढरा शर्ट आणि काळा सूट परिधान केला आहे. तर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने पांढरा वेडिंग ड्रेस परिधान केला आहे. दोन्ही कपल खूपच सुंदर दिसत आहेत. तसेच त्याचा मुलगा अगस्त्य याने सुद्धा आपले वडील हार्दिक पांड्यासारखा पोशाख घातला आहे.

hardik padnya wedding photos

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज इशान किशनने सुद्धा हार्दिकच्या लग्नाला हजेरी लावली होती. ईशानने त्याच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वतःचा आणि उदयपूरच्या राजवाड्यांचा फोटो शेअर केला आहे. या कथेच्या कॅप्शनमध्ये ईशानने #HPwedsNATS लिहिले. येथे HP म्हणजे हार्दिक पांड्या आणि NATS म्हणजे नताशा स्टॅनकोविक

hardik padnya wedding photos

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही थाटामाटात लग्न केलं आहे.