एक छोटा शिपाई बनून …; भाजप प्रवेशापूर्वी हार्दिक पटेलचे ट्वीट

Hardik Patel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा चांगलीच रंगली होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून पटेल आपल्या कार्यकर्त्यांसह दुपारी भाजप प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशापूर्वी हार्दिक पटेल यांनी एक ट्वीट केले असून “राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात एक छोटा शिपाई बनून काम करणार असल्याचे पटेल यांनी म्हटले आहे.

हार्दिक पटेल आज दुपारी 12 वाजता भाजप पक्ष प्रवेश करणार असून त्यांनी त्यापूर्वी एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एक नवा अध्याय सुरू करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रसेवेच्या भगीरथ कार्यात मी लहान शिपाई बनून काम करणार आहे.

 

पटेल यांनी ट्विट केल्याने त्यांनी आपण भाजप प्रवेशापूर्वी साधु-संतांसह गोपूजेत सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर 11 वाजता कमलम् गांधीनगरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.