हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिंदे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांच्या युक्तिवादाने उद्धव ठाकरेंची अडचण वाढली आहे. बहुमत चाचणी पूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकस आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरेच सरकार पडायला जबाबदार आहेत असा मोठा युक्तिवाद हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच राजीनामा दिली, त्यामुळे सरकार कोसळले. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगूनही ठाकरे बहुमत सिद्ध करू शकले नाही. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. पण तरीही त्यांनी बहुमत सिद्ध केलं नाही, असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला आहे त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कारण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच शिंदे यांनी बहुमताचा दावा केला. एकनाथ शिंदे याना अनेक आमदारांचा पाठिंबा होता. शिंदे गट आणि भाजपकडे बहुमत असल्यानेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, असेही हरीश साळवे यांनी कोर्टात सांगितले.