‘या’ बड्या नेत्याने दिला आमदारकीचा राजीनामा; म्हणाले, दिल्लीतील हिंसाचार मोदी सरकारचे षडयंत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंढीगड । दिल्लीतील ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिसांचारामागे केंद्रातील मोदी सरकारच असल्याचा आरोप इंडियन नॅशनल लोक दलाचे आमदार अभय चौटाला यांनी केलाय. तसेच, दिल्लीतील आंदोलनावरुन शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात येत असल्याचा विरोधात आणि दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ आमदार अभय चौटाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. चंढीगड विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. अभय चौटाला हे हरयाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पार्टीचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांचे काका आहेत.

राजीनामा देताना अभय चौटाला म्हणाले कि, ”मला खुर्ची नको माझ्या देशाचा शेतकरी आनंदी झाला पाहिजे. त्यामुळेच, शेतकरी आणि माझ्या मतदारसंघातील जनतेसमोर सही करुन मी माझा राजीनामा सोपवत आहे. देशातील प्रत्येक शेतकरी पुत्राने राजकारणापलिकडे जाऊन शेतकऱ्यांची साथ दिली पाहिजे, असे ट्विट चौटाला यांनी केलंय.

तर दुसरीकडे काँग्रेसनेही दिल्लीतील आंदोलनाची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांचीच असल्याचं म्हटलंय. अमित शहा यांच्या आदेशावरुनच दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलनातील शेतकरी नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करत आहे. दिल्ली पोलिसांच्या या कृतीतून भाजपा सरकारचाच हा डाव असल्याचे सिद्ध होते. गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयश आलंय. त्यामुळे, मोदी सरकारने अमित शहांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केलीय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’