खरंच… केरळमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली ? तज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या

corona antijen test
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोची केरळमध्ये पुन्हा एकदा कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील रोजच्या 50 टक्के केसेस केरळमध्ये नोंदवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत, महामारी विशेषज्ञ आणि तज्ञांचे मत आहे की,” केरळमधील तिसऱ्या लाटेची ही चाहूल असू शकते. मात्र, सरकारकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.” तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”केरळमध्ये, जेथे जून-जुलैमध्ये दुसऱ्या लाटेची प्रकरणे कमी झाल्यानंतर 12,000-14,000 प्रकरणे दररोज येत होती, गेल्या काही दिवसांत त्याची संख्या 20,000 वरून 22,000 पर्यंत वाढली आहे. राज्यात पॉझिटिव्ह प्रकरणांचे प्रमाण वाढून 12 टक्के झाले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट नुसार, महामारी विशेषज्ञ डॉ.रमन कुट्टी म्हणाले की,”कोरोना प्रकरणांमध्ये झपाट्याने झालेली वाढ हे दर्शवते की, केरळमध्ये तिसरी लाट सुरू झाली आहे आणि आपल्याला त्याबाबत सावध राहावे लागेल. येथे मोठ्या संख्येने लोकं संक्रमित होऊ शकतात आणि कोविडच्या नवीन लाटांचा सामना करण्यासाठी सरकारने दीर्घकालीन रणनीती आखली पाहिजे. केरळमध्ये आठवड्यात प्रकरणांमध्ये वाढ 0.60 टक्के आहे, तर राष्ट्रीय स्तरावर 0.13 टक्के आहे.”

कोरोनाच्या अनेक लाटा येतील
केरळ सरकारचे माजी एपिडेमियोलॉजिस्ट डॉ ए सुकुमारन म्हणाले की,”अशा कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनच्या अनेक लाटा आहेत, केरळमध्ये अशा अनेक लाटा असतील जिथे ते कमी होण्याआधीच केस अधिक वेगाने वाढू लागतील.” ते म्हणाले की,”स्पॅनिश फ्लूच्या काळातही, प्रकरणे चार लाटांनंतर खाली आली होती. मात्र कोविडच्या विविध व्हेरिएन्टसमुळे, त्याच्या लाटा जास्त असू शकतील.”

पहिल्या लाटेदरम्यान, केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे बराच काळ कमी होती आणि त्यानंतर एप्रिलमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाली, त्यानंतर संक्रमणाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेतही, राज्यात सात आठवड्यांपर्यंत प्रकरणांमध्ये घट झाली होती परंतु आता ती झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, केरळची 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या अजूनही संवेदनाक्षम आहे आणि आतापर्यंत केवळ 17 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

केरळमधील जीनोम सिक्वेंसींगमधून जे समोर आले आहे ते म्हणजे कोविडच्या डेल्टा व्हेरिएंट्सची सर्वाधिक संख्या केरळमध्ये आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, केरळमधील 95 टक्के प्रकरणे या प्रकारातील आहेत.