कोरोनाबाबत केंद्र सरकारचा केरळला सल्ला, तज्ञांच्या टीमला राज्यात अनेक त्रुटी आढळल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केरळमध्ये कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता, तेथे पाठवलेल्या 6 सदस्यांची टीम परत आली आहे आणि त्याचा रिपोर्ट त्यांनी केंद्राला सादर केला आहे. या टीमला केरळमध्ये ग्राउंड लेव्हलवर अनेक कमतरता आढळल्या, त्यानंतर त्यांनी कोरोना केस नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारला काही सूचना केल्या. या टीमला असे आढळले की, केरळमध्ये एक्टिव्ह सर्विलांस योग्यरित्या केला जात नाही.” त्यानंतर तज्ञांच्या या टीमने एक्टिव्ह सर्विलांस ठेवणे वाढवण्याचे सुचवले. सह आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

केंद्रीय टीमला असेही आढळले की,” केरळ सरकारने कोरोनाच्या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथे कडक कारवाई केली होती, मात्र याचा ग्राउंड लेव्हलवर कोणताही परिणाम झालेला नाही.” आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याची सूचनाही या टीमने केली आहे. यासह, त्यांनी कोरोना संक्रमित लोकांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख त्वरित करण्याच्या गरजेवर भर दिला.

या टीमने हे देखील पाहिले की, राज्यात होम आयसोलेशन संबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन केले जात नाही. राज्य सरकारने स्थापन केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना पेशंटला कॉमोर्बिडिटी म्हणजेच इतर कोणत्याही आजाराने अलग ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, केंद्रीय टीमने लसीकरण वाढविण्यावर आणि कंटेनमेंट झोन तयार करण्यावरही भर दिला.

विशेष म्हणजे केरळमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. देशभरात येणाऱ्या एकूण प्रकरणांपैकी पन्नास टक्के प्रकरणे एकट्या केरळमध्येच आहेत, त्यानंतर केंद्र सरकारने एक टीम तयार करून केरळला पाठवली.

Leave a Comment