हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन अस वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याला राष्ट्रवादी नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही व त्यांना कोल्हापूरमधून निवडून न आल्याबद्दल आम्ही टीकाही केली नव्हती, असे हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटल आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकात पुढे म्हटले आहे, विधानसभेच्या निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे, विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. भाजपचा एकही आमदार कोल्हापूरमध्ये निवडून आलेला नाही, त्यामुळे राजीनामा कोण देणार ? कशासाठी? हे होणार नाही, हे चंद्रकांत पाटील यांना माहित आहे. तसेच ज्या कोथरुडमधून आपण आमच्या मेघा कुलकर्णी ताईंना डावलून निवडून आला आहात, तिथे भाजप पक्षही परवानगी कशी देईल? दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी आजही कोल्हापुरातून निवडणूक लढण्यास तयार आहे. मी निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन. पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नाही तर पक्षाने आदेश दिल्याने निवडणूक लढवली. तेव्हाही मला कोल्हापुरातूनच निवडणुक लढवण्याची इच्छा होती.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’