हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचे म्हंटल.
माझ्यावर बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करण्यात आले असून माझ्यावर असे आरोप होणार हे माहीत होतं असं हसन मुश्रीफ यांनी म्हंटल. खर तर सोमय्यांना काहीही माहिती नाही. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. त्यांनी कागल, कोल्हापूर ला येऊन माहिती घ्यावी असे खुलं आवाहन हसन मुश्रीफ यांनी दिले.
किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. किरीट सोमय्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.