धोनीचा नवा लूक पाहिलात का?? Video होतोय वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो  ऑनलाइन | लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. क्रिकेटच्या मैदानापासून दुरावलेल्या भारतीय खेळाडूंनी या काळात सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी या काळात सोशल मीडियापासून जरा दूरच होता. फार मोजके अपवाद वगळता धोनी लॉकडाउन काळात सोशल मीडियावर आला नाही. धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत रांची येथील आपल्या फार्महाऊसवर राहतो आहे.

१४ फेब्रुवारीपासून धोनीने आपलं ट्विटर अकाऊंट वापरलेलं नाही. हीच गोष्ट त्याच्या इतर सोशल मीडिया हँडलची आहे. लॉकडाउन काळात आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल याकडे धोनी लक्ष देत होता. प्रदीर्घ काळानंतर धोनीने चाहत्यांसाठी आपला नवा लूक शेअर केला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने धोनीचा नवा लूक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी सुमारे वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे धोनीचं हे पुनरागमन लांबणीवर पडलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.