कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र, नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कोरोना बाधितांमध्ये वाढच होत आहे. कराड तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यातील महत्वाचे गाव असलेल्या आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुकमध्येही कोरोना बाधित होण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने बुधवारी कोरोना तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी यामध्ये 176 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात 7 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
रेठरे बुद्रुक या ठिकाणी राबविण्यात आलेल्या कोरोना तपासणी मोहीमेवेळी गावात विनाकारण फिरणारे नागरिक तसेच बाहेरून येणारे वाहनधारक व गावातील दुकानदार तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी अनेक ग्रामस्थांचे अहवाल हे निगेटिव्ह आले. तर काहींचे पॉझिटिव्ह आले आहेत.
रेठरे बुद्रुक येथे घेण्यात आलेल्या कोरोना तपर्णी मोहिमेवेळी सरपंच सुवर्णा कृष्णात कापूरकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विकास अधिकारी शरद बागडे, तलाठी विशाल पाटील, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी, डॉ. मैथिली मिरजे आदींनी उपस्थिती लावली होती.