नवी दिल्ली । तुम्ही Air India चे नाव ऐकले असेलच पण ज्याने हे नाव दिले त्या व्यक्तीचे नाव काय आहे? Air India ला जगभरात देशातील विमान कंपनी म्हणून ओळख मिळवून देणारे आहेत – जेआरडी टाटा (JRD TATA). त्याला उड्डाणाची आवड होती आणि आज त्यांच्या या आवडीमुळेच आज आपण Air India च्या विमानाने जगभर उड्डाण करत आहोत. प्रख्यात बिझनेस टायकून आणि एव्हिएटर जेआरडी टाटा 1929 मध्ये देशातील पहिले परवानाधारक पायलट बनले. भारतीय विमान वाहतुकीचे जनक ( Father of Indian aviation) जेआरडी टाटा यांचा जन्म (JRD Tata Birthday) जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणून झाला. आज 29 जुलै रोजी आपण त्यांची 117 वी जयंती साजरी करीत आहोत.
आपल्या मेहनतीने टाटा ग्रुपला यश मिळवून दिले
टाटा अँड सन्सचे अध्यक्ष म्हणून 50 वर्षे जे.आर.डी. टाटा यांनी टाटा ग्रुपला यश आणि उंची गाठून दिली. ते एक यशस्वी उद्योजक आणि दूरदर्शी विचारसरणीचे महान व्यक्ती होते. टाटाने समाजाच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले. आजही टाटाची गोष्ट प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणादायक आहे. चला तर मग एव्हीएशनबद्दलच्या त्यांचे प्रेम आणि आसक्तीची गोष्ट जाणून घेऊयात….
वयाच्या 15 व्या वर्षी ते पहिल्यांदा विमानात बसले होते.
जेआरडी टाटा यांना एअरप्लेन इतके आवडले होते की, वयाच्या पंधराव्या वर्षी जेव्हा ते पहिल्यांदा विमानात बसले होते तेव्हा त्यांनी एव्हीएशनमध्येच करियर करण्याचे ठरवले होते. त्यानंतर वयाच्या 24 व्या वर्षी कमर्शिअल पायलटचा परवाना मिळवणारे ते भारतातील पहिळेच व्यक्ती होते. 1930 मध्ये त्यांनी आगा खान स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतातून इंग्लंडमध्ये एकट्याने प्रवास केला होता. दोन वर्षांनंतर त्यांनी टाटा एअरलाइन्सची स्थापना केली, ज्याचे नाव नंतर एअर इंडिया असे ठेवले गेले. आपल्या कार्यकाळात त्यांनी एअर इंडियाला खूप उंचीवर नेले. एअर इंडिया चांगल्या सेवेसाठी ओळखली जायची.
फ्लाइटमध्ये स्वत: टॉयलेट पेपर बदलण्यासाठी गेले
एअर इंडियाशी हे त्यांचे अतूट नाते होते, इतके कि स्वत: प्रवासादरम्यान टॉयलेट पेपर तपासत असत. वास्तविक, एकदा फ्लाइट दरम्यान, ते स्वतः शौचालयात टॉयलेट पेपर बदलण्यासाठी गेले होते. RBI चे माजी गव्हर्नर लालकृष्ण झा त्यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करत होते. लिंक्डइनचे ब्रँड कस्टोडियन हरीश भट्ट यांनी जेआरडी टाटाच्या जीवनाशी संबंधित एक गोष्ट शेअर केली, ज्यात असे सांगितले गेले होते की, जेआरडी टाटा एअर इंडियातून प्रवास करत होते, तेव्हा त्यांच्याबरोबर RBI चे माजी गव्हर्नर लालकृष्ण झा होते. त्याच वेळी ते बराच काळ कुठेतरी गेले होते जेव्हा लालकृष्ण झा यांनी विचारले की,” आपण कोठे गेला होता? यावर जे.आर.डी. टाटा यांनी उत्तर दिले की, शौचालय स्वच्छ आहे की नाही हे पाहायला गेलो होतो. टॉयलेट पेपर व्यवस्थित बसत नव्हता, ते दुरुस्त केल्याचे त्यांनी सांगितले.