व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

तुमच्याकडेही HDFC क्रेडिट कार्ड आहे? 1 जानेवारीपासून बदलणार नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हीही जर HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नवीन अपडेट अंतर्गत HDFC चे क्रेडिट कार्ड वापरणे महाग होणार आहे. त्यामुळे करोडो ग्राहकांना बँकेकडून आणखी एक झटका बसला आहे. नवीन क्रेडिट कार्ड शुल्क नवीन वर्षापासून लागू होण्याची अपेक्षा आहे. काही ग्राहकांना यासंबंधीचे मेसेजही आले आहेत.

बँकेच्या थर्ड पार्टी मर्चंटद्वारे भाडे भरण्यावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात बदल करण्यात आला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, आता व्यवहाराच्या एकूण रकमेच्या 1 टक्के रक्कम अशा पेमेंटसाठी शुल्क म्हणून आकारली जाईल. हे शुल्क दुसऱ्या महिन्याच्या भाडे व्यवहारातून घेतले जाईल. यासोबतच बँकेने रिवॉर्ड पॉइंट सिस्टम आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार शुल्कातही बदल केले आहेत.

नवीन वर्षापासून क्रेडिट कार्ड रिवॉर्ड सिस्टीममध्ये बदल करण्याचीही बँक तयारी करत आहे. वेगवेगळ्या कार्डांसाठी रिवॉर्ड सिस्टम वेगळी असेल. तुम्ही या रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर भाडे भरण्यासाठी, फ्लाइट आणि हॉटेल्स सारखे बुकिंग करण्यासाठी किंवा व्हाउचर खरेदी करण्यासाठी करू शकता.

तुम्ही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून भारतीय रुपया (INR) मध्ये कोणताही व्यवहार केल्यास, तुम्हाला 1 टक्के रूपांतरण शुल्क भरावे लागेल.हे शुल्क इतर कोणत्याही देशात नोंदणीकृत असलेल्या भारतातील व्यापाऱ्यांसोबतच्या व्यवहारांसाठीही लागू होईल.