नवी दिल्ली । आपण एचडीएफसी बँकेचे ग्राहक असल्यास आपल्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आपल्या बँकेचे कोणतेही काम जर डिजिटल पद्धतीने निकालात काढायचे असेल तर ते आजच्या दिवसातच पूर्ण करा. देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. उद्या, शनिवारी 8 मे 2021 रोजी नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा उपलब्ध होणार नाहीत.
बँकेने काय म्हंटले ?
शुक्रवारी रात्री त्यांची नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा विस्कळीत होईल, असे बँकेने म्हटले आहे. ई-मेलद्वारे पाठविलेल्या मेसेजमध्ये बँकेने म्हटले आहे की, ‘काही नियोजित देखभाल दुरुस्तीच्या कारणामुळे नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवा 8 मे रोजी सकाळी 8 ते सकाळी 5 या वेळेत उपलब्ध होणार नाहीत.’ नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग अॅपच्या सेवा सुधारण्यासाठी बँका सातत्याने मेंटेनेंस करत आहेत जेणेकरून ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये.”
SBI ने आपल्या ग्राहकांना सतर्क केले
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सेवेसंबंधी (SBI Important Notice) ट्विट करुन माहिती दिली आहे. SBI ने ट्विट केले आहे की,” बँकेच्या काही सेवा मेंटेनेंस एक्टिविटी मुळे बंद केल्या जातील.” SBI चे म्हणणे आहे की,” कोणत्याही अडथळ्याशिवाय ग्राहकांना बँकिंगचा अनुभव देण्यासाठी सेवा सुधारण्यासाठी मेंटेनेंस वर्क केले जात आहे.” SBI ने महत्त्वपूर्ण नोटिसाअंतर्गत ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की,”आज 7 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता आणि 8 मे रोजी सकाळी 1:45 वाजता बँकेचे मेंटेनेंस करण्याचे काम सुरु होईल. बँकेने म्हटले आहे की,” यावेळी SBI ग्राहकांना INB/YONO/YONO Lite/UPI सेवा वापरता येणार नाहीत.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group