Wednesday, February 8, 2023

HDFC Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार जास्त नफा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या HDFC Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. HDFC Bank आता ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7% आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त 7.75% व्याज देईल.

HDFC Bank FD Rates: Big news for customers, HDFC Bank again increased FD  interest rates, , know how much return you will get - Rightsofemployees.com

24 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू

- Advertisement -

बँकेच्या वेबसाइटनुसार, 24 जानेवारी 2023 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत. या बदलानंतर आता बॅंकेकडून सर्वसामान्यांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 3 टक्के ते 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्क्यांवरून 7.75 टक्के व्याज देण्यात येणार आहे.

HDFC Bank Hikes Fixed Deposit Interest Rates; Check Latest FD Rates

ज्येष्ठ नागरिकांसाठी HDFC Bank च्या एफडीचे व्याजदर

ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या FD वर 50 बेस पॉईंट्सचा अतिरिक्त व्याजदर मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 75 बेस पॉईंट्सचा अतिरिक्त व्याज दर मिळेल.
HDFC बँकेची सिनिअर सिटीजन केअर एफडी स्कीमवर 75 बेस पॉईंट्सचा अतिरिक्त व्याज दर मिळेल.
HDFC बँकेची ही स्पेशल FD 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

सामान्य लोकांसाठी HDFC Bank च्या एफडीचे व्याजदर

7 ते 29 दिवसांसाठी FD वर 3 टक्के
30 ते 45 दिवसांसाठी FD वर 3.50 टक्के
46 ते 6 महिन्यांच्या FD वर 4.50 टक्के
6 महिने ते 9 महिन्यांच्या FD वर 5.75 टक्के
9 महिने, 1 दिवस ते 1 वर्षाच्या FD वर 6 टक्के
1 वर्ष ते 15 महिन्यांच्या FD वर 6.60 टक्के
15 महिने ते 10 वर्षांच्या FD वर 7 टक्के

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.hdfcbank.com/personal/save/deposits/fixed-deposit-interest-rate

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये