हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank : गुंतवणुकीच्या अनेक पर्यांयांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स हा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच चांगला नफा देखील मिळतो. यामध्ये पैसे जमा करून ठराविक कालावधीनंतर खात्रीशीर रिटर्न मिळतो. RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ केली गेली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यादरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील HDFC Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्स वरील व्याजदरात वाढ केली आहे.
आपल्या ग्राहकांना दिवाळीची भेट देताना HDFC Bank ने जवळपास 2 महिन्यांनंतर FD वरील व्याज दर वाढवले आहेत. यावेळी बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 0.75 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ज्यानंतर आता ग्राहकांना FD मध्ये जमा केलेल्या पैशांवर 75 बेसिस पॉइंट्सपर्यंत जास्त व्याज दर मिळेल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, 11 ऑक्टोबरपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
नवीन व्याज दर जाणून घ्या
HDFC Bank कडून आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर 3 ते 6 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर 3.50 टक्क्यांवरून 6.75 टक्के असेल. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, बँकेने 7 दिवस ते 29 दिवसांच्या कालावधीच्या FD वरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी वाढवून 3 टक्के केला आहे. त्याच वेळी, 30 दिवस ते 60 दिवसांच्या FD वरील व्याजदर 3.25 टक्क्यांवरून 3.50 टक्के करण्यात आला आहे.
या कालावधीसाठीचे नवीन व्याजदर
HDFC Bank कडून आता 61 दिवस ते 89 दिवसांच्या FD वर 4 टक्के व्याज दिले जाईल. त्याच वेळी, 90 दिवस ते 6 महिन्यांच्या FD वर 4.25 टक्के, एक वर्ष आणि 2 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के, 2 वर्षे ते 3 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.50 टक्के व्याजदर दिला जाईल.
या कालावधीसाठी दिला जाईल 6.75 टक्के व्याजदर
हे लक्षात घ्या कि, HDFC Bank ने 3 वर्षापासून 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यानंतर तो 5.70 टक्क्यांवरून 6.10 टक्के झालाआहे. त्याचप्रमाणे, 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या FD वरील व्याजदर 6.75 टक्के करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/rates
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ 6 योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!
Train Cancelled : रेल्वेकडून 159 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या दरात झाला बदल, नवीन दर पहा
‘या’ दिवाळी सेलमध्ये स्वस्त दरात iPhone 13 मिळवण्याची संधी !!!
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का !!! MCLR आधारित कर्ज दरात केला बदल