हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC Bank कडून ग्राहकांच्या सोयीसाठी एसएमएस बँकिंग सर्व्हिसेसचा विस्तार करण्यात आला आहे. बँकेने सांगितले की,”आता ग्राहकांना कोठूनही 24/7×365 आमच्या सुविधांचा लाभ घेता येईल. यासाठी त्यांना फक्त एक एसएमएस करावा लागेल.”
HDFC Bank नुसार, या नवीन एसएमएस सुविधेद्वारे ग्राहकांना आपल्या खात्यातील बॅलन्स आणि समरीची माहिती घेता येईल. याशिवाय, कर्जासाठी अर्ज करणे, क्रेडिट कार्ड मॅनेज करणे, चेक बुकसाठी आणि अकाउंट स्टेटमेंटसाठी रिक्वेस्ट करणे यासारखी कामे कुठूनही करता येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या एसएमएस बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला आता मोठाले मेसेजेस करण्याची गरज नाही. यासाठी फक्त बँकिंग भाषा वापरलीच पाहिजे असेही नाही, तर यामध्ये ग्राहक आपल्या सामान्य भाषेत जे काही लिहील ते AI ला समजेल आणि तो फीडबॅक देईल.
‘या’ क्रमांकावर करावा लागेल एसएमएस
HDFC Bank ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, बँकिंग सर्व्हिस आता फक्त एक मेसेज दूर आहे. #BankOnUs तुम्ही कोठेही असाल, याद्वारे तुम्हाला बँकिंग सर्व्हिसेसची दीर्घ श्रेणी दिली जाईल. ही सुविधा दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस आणि वर्षातील 365 दिवस मिळेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी एसएमएसमध्ये रजिस्टर असे लिहून स्पेस द्यावे लागेल, त्यानंतर ग्राहक आयडीचे शेवटचे चार अंक, त्यानंतर खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक लिहून 7308080808 वर पाठवावा लागेल.
Banking services are now a text away!#BankOnUs and access a wide range of banking services from wherever you are, round-the-clock. 24/7 x 365!
To get started, SMS “Register” <Space> “Last 4 digits of customer ID” <Space> “Last 4 digits of account number” to 7308080808 pic.twitter.com/SWSCyY678m
— HDFC Bank (@HDFC_Bank) August 25, 2022
HDFC Bank ने सांगितले की, एकदा ग्राहकाने या क्रमांकावर स्वत:चे रजिस्ट्रेशन केले की, ग्राहकाला हवी असलेली कोणतीही सुविधा फक्त एका SMS वर उपलब्ध होईल. या एसएमएस बँकिंग सुविधेसाठी रजिस्ट्रेशन पूर्ण होण्यास चार कामकाजी दिवस लागतील. तसेच रजिस्ट्रेशनसाठी अर्ज सादर केल्यानंतर हा कालावधी सुरू होईल.
ग्राहकाला मिळेल नोटिफिकेशन
एसएमएस बँकिंगसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर, बँकेकडून मोबाइलवर एक पाठवली जाईल. त्यात लिहिलेले असेल – तुमचे रजिस्ट्रेशन यशस्वी झाली आहे. तुमचे बँक खाते एचडीएफसी बँकेच्या एसएमएस बँकिंग सर्व्हिससाठी डीफॉल्ट खाते म्हणून नोंदवले गेले आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार असून सध्या ती फक्त इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आली आहे.
एटीएमद्वारेही रजिस्ट्रेशन करता येईल
त्यासाठी सर्वांत आधी जवळच्या HDFC Bank च्या ATM वर जा.
यानंतर डेबिट-एटीएम कार्ड टाका आणि पिन टाका.
आता ATM च्या स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या ‘More Options’ वर जा आणि एसएमएस बँकिंग रजिस्ट्रेशनसाठी आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर एंटर करा.
‘Confirm’ बटण दाबल्यानंतर मोबाईलवर रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/ways-to-bank/smsbanking
हे पण वाचा :
RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा
LIC ची पॉलिसी सरेंडर करण्याआधी त्यासंबंधीच्या ‘या; महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल, आजचा भाव पहा
‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!