हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची बँक असलेल्या HDFC Bank च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सनंतर रिकरिंग डिपॉझिट्सवरील (RD) व्याजदरातही वाढ केली आहे. रिकरिंग डिपॉझिट्सवरील व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बँकेने 27 ते 120 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वरील व्याज दरात वाढ केली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. ज्यामुळे आता HDFC Bank ने RD वरील व्याजदरातही वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 17 मे पासून लागू झाले आहेत. एचडीएफसी बँकेचा मोठा ग्राहकवर्ग आहे आणि अनेक लोकं RD करण्यासाठी HDFC बँकेला प्राधान्य देतात.
HDFC Bank कडून 27 महिने ते 36 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वर 5.40 टक्के व्याज देण्यात येणार आहे. तसेच बँकेने 39 ते 60 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वर ग्राहकांना 5.60 टक्के व्याज मिळणार आहे. त्यासोबतच 90 ते 120 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वर 5.75 टक्के व्याज मिळणार आहे.
HDFC Bank कडून ज्येष्ठ नागरिकांना सहा महिने ते 60 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वर 0.50 टक्के जास्त व्याज दिले जाईल. याशिवाय 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांत मॅच्युर होणाऱ्या RD वर देखील 0.50 टक्के व्याजाबरोबरच 0.25 टक्के जास्त व्याज देखील दिले जाईल. इथे हे लक्षात घ्या कि 5 कोटींपेक्षा कमी RD करणाऱ्या किंवा 18 मे 20 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत जुन्या RD चे रिन्यूअल करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाच हे व्याजदर दिले जाईल. तसेच 90 ते 120 दिवसांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या RD वर वार्षिक 6.50 टक्के दराने व्याज मिळेल.
बँकेकडून सहा महिने, नऊ महिने आणि 12 ते 24 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सहा महिन्यांत RD मॅच्युर झाल्यावर बँक पूर्वीप्रमाणेच वार्षिक 3.50 टक्के दराने व्याज देईल. 9 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वर 4.40 टक्के तर 12 ते 24 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या RD वर 5.10 टक्के दराने व्याज दिले जाईल. HDFC Bank
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfcbank.com/personal/resources/rates
हे पण वाचा :
FD Rate : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD च्या दरात केली वाढ !!!
2000 Note : खरंच… 2000 रुपयांची नोट बंद झाली ??? RBI काय म्हणाली ते पहा
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे
PM Kisan : आता घरबसल्या अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC
IPL 2022 : प्लेऑफमध्ये नेहमीच धोकादायक ठरतो आर अश्विन, आकडेवारी काय सांगते पहा