HDFC Business Loan : अनेक तरुणांना आयुष्यात स्वत:चा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरु करण्याची इच्छा असते. व्यवसायाचा अभ्यास, त्यासंबंधीचे ज्ञान मिळवल्यावर व्यवसाय उभारण्यासाठी भांडवलाची गरज भासते. अपेक्षित भांडवल नसेल तर व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक जण विविध बॅंका, पतसंस्थांकडून कर्ज घेतात. त्या कर्जाचे व्याज जास्त असल्याने वा नियम, अटी व शर्ती योग्य नसल्याने ते कर्ज फेडणे काहीवेळा अशक्य होते. परंतु आता चिंता करू नका. HDFC बँक तुम्हाला व्यवसायासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज देत आहे. यासाठी पात्रता काय आहे? बँकेचे नियम काय आहेत आणि व्याजदर किती असेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
HDFC बँकेकडून बिझनेस लोन मिळत कस? HDFC Business Loan
HDFC ही खाजगी क्षेत्रातील उत्तम मानांकन असलेली मोठी बँक असून व्यवसायाकरिता कर्ज मिळविण्यासाठी बहुतांश ग्राहक या बँकेलाच प्राधान्य देतात. जलद रीतीने कर्ज मंजुरी, ग्राहकांसाठी सुरक्षित कर्ज आणि कर्ज मंजुरीनंतर तात्काळ बँक खात्यामध्ये पैसे दिले जातात. तसेच छोटे व्यावसायिक, दुकानदार व व्यवसायवाढ करण्याकरिता, तसेच यंत्रसामग्री खरेदीसाठी व स्टार्टअपसाठी जमीन खरेदी करायची असेल तर या बँकेकडून तुम्हाला कर्ज (HDFC Business Loan) मिळते. ज्यांना ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून घरबसल्या बिजनेस लोन हवे असेल तर HDFC बँकेतून बिजनेस लोनच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी अथवा छाननी केल्यानंतर बँकेतून कर्ज मंजुरी मिळते. यासाठी तुम्हाला काही महत्वाची माहिती बँकेच्या अर्जात भरून द्यावी लागते. त्यानंतर तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जलद रीतीने बँक ट्रान्सफर करते.
काय आहेत बँकेचे निकष –
1- सदर लाभार्थीचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
2- महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जदार हा भारताचा नागरीक असावा. त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि पत्ता असे गरजेचे पुरावे असावे.
3- सदर अर्जदाराचा सिबिल स्कोर कमीत कमी 750 असायला हवा आवश्यक.
4- HDFC बँकेत सदर लाभार्थी व्यक्तीचे बचत (Saving) किंवा चालू (Current) खाते असावे
5- तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्याबाबतचे कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
6- तुम्हि जो व्यवसाय करणार आहे त्याची वार्षिक उलाढाल कमीत कमी 40 लाख रुपयांपेक्षा जास्त असावी तसेच 3 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असावा
7 – व्यवसायाचे कमीत कमी वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये प्रति वर्ष असावे. तसेच तुमच्याकडे आयटीआर स्लिप असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे-
केवायसी कागदपत्रे (ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्माचा पुरावा)
पॅन कार्ड
तुमचे ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट
कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा
व्यवसाय सुरू असल्याचा पुरावा
उत्पन्नाच्या गणनेसह नवीनतम ITR
असा करा अर्ज-
1- सर्वप्रथम तुम्ही HDFC बँकेच्या व्यवसायाच्या वेबसाईटवर जाणे आवश्यक.
2- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वापरून साइन अप करणे महत्वाचे.
3- तुम्ही साइन अप करताच आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडले जाईल. त्या पेजवर मोबाईल नंबर, HDFC बँकेचा खाते क्रमांक तसेच कर्जाची रक्कम (HDFC Business Loan) इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर प्रोसिड या बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.
4- नवीन येणाऱ्या पेजवरील अर्ज योग्य माहिती देऊन भरा तसेच या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे त्याठिकाणी अपलोड करा.
5- आता अटी व शर्तींवर ई स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुमचा आधार क्रमांक तुम्हाला द्यावा लागेल .
6- यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल तो तुम्ही टाका.
7- OTP टाकल्यानंतर आणि सर्व डिटेल्स भरल्यानंतर बँक लोनच्या ऑफरची पुष्टी करणे गरजेचे आहे. यासाठी पुढे जावे व टॅप करण्याची आवश्यकता आहे.
8- त्यानंतर तुमच्या बँकेच्या खात्यावरील तपशील उदा. खाते क्रमांक, IFSC कोड इत्यादी टाकणे आवश्यक आहे.
9- हे सर्व केल्यानंतर तुम्ही मागणी केलेल्या मंजूर कर्जाची रक्कम 24 तासांच्या आत तुमच्या खात्यात (HDFC Business Loan) बँकेकडून जमा होईल.
कर्ज मिळण्याची मर्यादा किती आहे ?
तुम्हाला HDFC बँकेकडून व्यवसाय उभारण्याकरिता पाच लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकेल. तसेच हे कर्ज तुम्हाला 11.90% व्याजदरावर मिळेल. हे कर्ज फेडायची कधी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, हो ना तर कर्ज मंजूर झाल्यानंतर 12 महिने ते 48 महिन्यांच्या मुदतीत त्याची परतफेड करणे गरजेचं असत.