हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । होम लोन देणारी कंपनी असलेल्या HDFC लिमिटेडकडून आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देण्यात आला आहे. RBI कडून रेपो दरात 50 बेस पॉइंट्सने (5.9%) वाढ करण्यात आल्यानंतर HDFC Ltd ने देखील शुक्रवारी आपल्या होम लोन वरील दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली. हे लक्षात घ्या कि, गेल्या 5 महिन्यांत HDFC कडून एकूण 7 वेळा दर वाढवण्यात आले आहेत.
HDFC कडून होम लोन घेतलेल्यांच्या EMI मध्ये वाढ होणार
या दर वाढीमुळे आता एचडीएफसीकडून होम लोन घेतलेल्यांच्या ईएमआयमध्येही वाढ होईल. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर आता इतर वित्तीय संस्था आणि बँका देखील आपल्या दरात दर वाढ करू शकतात.
1 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू
एका निवेदन जरी करत कंपनीने म्हटले की, “HDFC ने होम लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 50 बेस पॉइंट्सने वाढवले आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2022 पासून ही दरवाढ लागू होणार आहे.”
रेपो रेट 3 वर्षांच्या उच्चांकावर
शुक्रवारी (30 सप्टेंबर 2022) RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्के केला. हा गेल्या 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfc.com/housing-loans/home-loan-interest-rates
हे पण वाचा :
Repo Rate वाढल्याचा पर्सनल-एज्युकेशन लोनवर कसा परिणाम होईल ते समजून घ्या
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!! कसे ते जाणून घ्या
Sukanya Samriddhi Yojana म्हणजे काय ??? त्यावरील व्याजदर जाणून घ्या
RBI च्या रेपो वाढीचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होणार ते समजून घ्या