हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । HDFC : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या एचडीएफसीकडून आपल्या होम लोनच्या व्याजदरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात HDFC ही तिसरी वाढ झाली आहे. यामुळे सध्याच्या आणि नवीन ग्राहकांसाठी होम लोन महागले आहेत. आता ग्राहकांना जास्त EMI भरावा लागेल. 1 जून 2022 पासून हे नवीन दर लागू झाले आहेत.
HDFC ने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले गेले आहे की, होम लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 5 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आलेला आहे. कंपनीने यापूर्वी 2 मे रोजी या आपल्या RPLR मध्ये 5 बेसिस पॉईंट्सने तर 9 मे रोजी 30 बेसिस पॉईंटने वाढ केली होती. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी 4 मे रोजी RBI कडून रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. ज्यानंतर सर्व बँका आणि फायनान्स कंपन्यांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. इथे हे लक्षात असू द्यात कि, अॅडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) RPLR द्वारे निश्चित केले जातात.
30 लाखांपर्यंतचे होम लोन घेणाऱ्यांना आता 7.05 टक्क्यांवरून 7.10 टक्के व्याजदराने पैसे द्यावे लागणार आहे आहे. महिला ग्राहकांसाठीचा व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.05 टक्के करण्यात आला आहे. 30 लाखांपेक्षा जास्त आणि 75 लाखांपेक्षा कमी रकमेच्या होम लोनवरील व्याजदर 7.40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या रकमेच्या लोनसाठी महिला ग्राहकांना आता 7.35 टक्के व्याज द्यावे लागणार आहे. तसेच 75 लाखांपेक्षा जास्त कर्ज घेण्यासाठी महिला ग्राहकांना आता 7.45 टक्के व्याजदर द्यावा लागणार आहे. तर उर्वरित ग्राहकांना 7.5 टक्के दराने पैसे द्यावे लागतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.hdfc.com/housing-loans/home-loan-interest-rates
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने महागले तर चांदीमध्ये झाली घट, आजचे नवीन दर पहा
FD Rates : आता ‘या’ खाजगी बँकेने देखील आपल्या FD वर व्याजदरात केली वाढ !!! नवे दर पहा
Interest Rates : आता ‘या’ फायनान्स कंपनीकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ !!!
Online Fraud : डिजिटल बँकिंगमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
Gold Loan : पैशांची गरज भासतेय ??? ‘या’ बँकांकडून स्वस्त दरात मिळेल गोल्ड लोन